अकोला – अकोल्यातल्या मनपा उर्दू क्रमांक एक शाळेतील 8 विद्यार्थ्यांचा अपहरणाचा प्रयत्न झालाय. हा अपहरणाचा प्रयत्न शिक्षकांनी हाणून पाडला आहे. शाळा सुटल्यानंतर एका महिलेनं 8 विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि कचोरीचं आमिष देत सोबत नेण्याचा प्रयत्न केला, यामध्ये 4 मुलं आणि 4 मुलीचा समावेश होता. हा प्रकार शालेच्या शिक्षकांच्या आणि पालकांच्या निदर्शनास आला, त्यांनी महिलेकडे धाव घेतली. आणि महिलेच्या तावडीतून आठही विद्यार्थ्यांची सुटका केली. त्यानंतर अपरहणकर्त्या महिलेला स्थानिक महिलांनी चांगलाचं चोप दिलाय. सद्यस्थितीत या प्रकरणात नागरिकांनी अपहरणकर्ता महिलेला सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले, पुढील कारवाई केल्या जात आहे. महिलेंचं अपहरणाचं बिंग फुटल्यानंतर आपण मुलांचे नातेवाईंक असल्याचे सांगत होती, पण कुटुंबियांनी आणि शालेय शिक्षकांच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण प्रकार उजेडात आलाय.
दरम्यान आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास अकोला महापालिकेच्या ‘उर्दू मराठी क्रमाक 1’ शाळा सुटलीय. सर्व विद्यार्थी शाळेबाहेर पडले, तितक्यात एका 40 वर्षीय महिलेनं 7 ते 8 शालेय विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि कचोरी सोबतचं खजूरचं आमिष दिलं. त्यानंतर सोबत नेण्याचा बळजबरी प्रयत्न केला, हा प्रकार शालेय शिक्षक आणि पालकांच्या लक्षात आले, त्यांनी धाव घेतली आणि महिलेच्या ताब्यातील मुलांची सुटका केली. या घटनेनंतर शालेय परिसरातील घटनास्थळावर नागरीकांसह पालकवर्गाची मोठी गर्दी झाली होती. शालेय शिक्षकांसह नातेवाईकांनी सिटी कोतवाली पोलिस स्टेशन गाठलं, अन् तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहे.