देश

आसामचे मुख्यमंत्री स्वखर्चाने आपले वीज बिल भरणार

गुवाहाटी – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा पुढील महिन्यापासून आपल्या शासकीय निवासस्थानाचे वीज बिल स्वखर्चाने भरणार आहेत. सर्व लोकप्रतिनिधींसमोर एक आदर्श उदाहरण घालून देण्यासाठी सर्मा यांनी ही घोषणा केली आहे.

लोकप्रतिनिधींचे शासकीय निवास स्थानाचे वीज बिल सरकारच्या वतीने भरले जाते. मात्र मुख्यमंत्री सर्मा यांनी सरकारी खर्च वाचविण्यासाठी १ जुलैपासून सर्व लोकप्रतिनिधींना स्वतःचे वीज बिल स्वतःच्या खर्चाने भरण्याचे आवाहन केले आहे. त्याची सुरुवात ते स्वतःपासून करणार आहेत. मुख्यमंत्री सर्मा आणि आसामचे मुख्य सचिव १ जुलै रोजी आपापले वीज बिल भरून या आदर्श योजनेचा शुभारंभ करणार आहेत.