ताज्या बातम्या मुंबई

तक्रार करुनही नाला साफ न झाल्याने मध्य रेल्वे खोळंबली

मुंबई – 26 जून 2024 रोजी कुर्ला कारशेड नाला साफ न झाल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी करुनही मध्य रेल्वे आणि पालिका प्रशासनाने नाला साफ न करत जबाबदारी एकदुस-यांवर ढकलल्याने मध्य रेल्वे रुळावर पाणी आल्याने खोळंबली.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली हे 26 जून रोजी कुर्ला कारशेड नाल्याशेजारी असलेल्या रस्त्यावरुन कुर्ला स्टेशनकडे जात होते. याबाबत अनिल गलगली यांनी रेल्वे आणि पालिका प्रशासनाला ट्विट करत नाला साफ करण्याची विनंती केली अन्यथा रेल्वे सेवा खोळंबण्याची शक्यता वर्तवली. याबाबत पालिकेने मध्य रेल्वेच्या मंडळ रेल्वे व्यवस्थापक यांस तक्रार पुढील कारवाईसाठी पाठविली. मंडळ रेल्वे व्यवस्थापक यांनी वरिष्ठ विभागीय अभियंता समन्वय यांसकडे तक्रार पाठविला. वरिष्ठ विभागीय अभियंता समन्वय यांनी पालिकेची जबाबदारी असल्याचे सांगत जबाबदारी झटकली.

मध्य रेल्वे आणि पालिका प्रशासनाने जबाबदारी झटकली आणि नाला साफ न झाल्याने पाणी रुळावर आले, असे सांगत अनिल गलगली म्हणाले की नाहक प्रवासी भरडले जातात. याबाबत भविष्यात जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. आताजे घडले आहे त्याची मध्य रेल्वे महाव्यवस्थापक आणि पालिका आयुक्तांनी चौकशी करत संबंधितांना कारवाई करण्यात यावी.