महाराष्ट्र

मुक्या प्राण्यांसाठी भावनिक आवाहन

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तापमान कमालीचं वाढलं आहे. त्यामुळे यावर्षीचा उन्हाळा हा अधिक चटके देणारा आणि ‘ताप’दायक ठरतो आहे. मुंबईसह उपनगरं आणि इतर शहरांमधल्या लोकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागतो आहे. तसंच आरोग्याच्या समस्याही जाणवत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी सरकारला पत्र लिहिलं आहे या पत्रात त्यांनी शाळांना सुट्टी देण्याची मागणी केली आहे.

गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास ४० अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. असो.

मनसैनिकांना विनंती
माझी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती आहे की, तुम्ही पण उष्णतेच्या लाटेत स्वतःची काळजी घ्या. तसंच ह्या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्षांचे (राजकीय नव्हेत ) आणि निराधार आणि बेघर लोकांचे.त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल ह्याची तजवीज करा.आणि प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत, त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅलरीत, गच्चीत पाणी ठेवा.