करिअर

कॉलेजमध्ये शिकविणार कसे राहायचे अन इंग्रजी कसे बोलायचे?

अमरावती, 24 सप्टेंबर : राज्यातील अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन व उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी संवाद कौशल्य आणि मूल्ये आधारित जीवनशैली अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये व विकास या बाबींवर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. या विषयातील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात रोजगार मिळविण्यासाठी आवश्यक कौशल्य प्रत्यक्ष वर्गात शिकविले जाणार आहे. दरम्यान, यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.१६५ तासांचा इंग्रजी संवाद कौशल्य आणि मूल्ये आधारित जीवनशैली या विषयातील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.राज्यातील अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन व उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांतील अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना या इंग्रजी संवाद कौशल्य आणि मूल्ये आधारित जीवनशैली अभ्यासक्रमाचे धडे दिले जाणार आहेत.

उच्च व तंत्र विभाग- इन्फोसिसमध्ये करार

यासंदर्भात मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर आणि इन्फोसिस उन्नती फाउंडेशनचे रमेश स्वामी यांनी नुकतीच सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

स्वावलंबी होण्यास मदत

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी संवाद कौशल्य आणि मूल्य आधारित जीवनशैलीसह विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरुन स्वावलंबी होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.