Amit Shah's effigy burnt in Akota
अकोला

अकोटात जाळला अमित शहाचा पुतळा

अकोट: संसदेत अमित शहा याने विर्श्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकेरी नाव घेत अवमान केला. त्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन युवा आघाडी ने अमित शहाचा प्रतिकात्मक पुतळा युवा आघाडी अकोट तालुका अध्यक्ष आशिष रायबोले व महासचिव अमन गवई यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाळला.

यावेळी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ ‘बाळासाहेब आंबेडकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है” मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शहा मुर्दाबाद” निमका पत्ता कडवा है, अमित शहा भडवा है “वंचित बहुजन युवा आघाडीचा विजय असो ‘अशा घोषणांनी परिसर दणाणला होता.

यावेळी अंदोलन काऱ्यांकडे कडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो सुद्धा होता. या पुढे बाबासाहेब आंबेडकरांचे एकेरी नाव घेतल्यास भाजप च्या स्थानिक जनप्रतिनिधिंचे घरे फोडली जातील आणि त्यांना ठोकून काढू असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीने दिला.

यावेळी युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष N निषेध आशिष रायबोले महासचिव अमन गवई, प्रदीप वानखडे, संदीप आग्रे, प्रदीप चोरे, स्वप्नील वाघ, सचिन उमाळे, उमेश लबडे, राजपाल बडगे, रोशन रायबोले, विशाल वानखडे, उल्हास तेलगोटे, दिनेश घोडेस्वार, आकाश वाकोडे, सदानंद तेलगोटे, भूषण मोहोळ लखन इंगळे, राहुल धांडे, विकी धांडे, आदित्य धांडे, सुनील घनबहाद्दूर, नंदू मापारी, अक्षय तेलगोटे, निलेश तेलगोटे, प्रवीण सोनवणे, प्रमोद बुंदे, सचिन धुळे, संजय तेलगोटे, शेख इकबाल, हिरा सरकटे, नितीन वानखडे, आशिष वासनिक, विशाल आग्रे, प्रतीक तेलगोटे यांच्यासह वंचित युवा आघाडीचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.