महाराष्ट्र

‘ती’ वादग्रस्त आयएएस अधिकारी आता अकोल्यात येणार!

अकोला – संपूर्ण राज्यात विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आता पुजा खेडेकर या आता अकोल्यात येणार असल्याची माहिती आहे. पुणे, वाशिमनंतर पूजा खेडेकर या अकोल्यात येणार आहेत. 15 ते 19 जुलै दरम्यान अकोला येथील प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग म्हणून त्या आठवडाभर कामकाज प्रशिक्षण करिता हजर होणार असल्याची माहीती आहे. तर त्यानंतर 22 जुलै पासून त्या विविध शासकीय अधिकारी यांची भेट घेऊन कामकाजाचा अनुभव घेणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

राज्यात सध्या आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडेकर या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात असतांना त्यांचे अनेक कारनामे समोर आले आहेत. त्यांच्या अवास्तव मागण्या आणि कारनामे एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला ही मागे पाडणारे आहेत. पुणे येथे प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून असतांना आएएस अधिकारी पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. त्यानंतर पुणे येथील जिल्हाधिकारी यांच्या तक्रारीनंतर पूजा खेडकर यांची विदर्भातील वाशिम जिल्ह्यात उचलबांगडी करण्यात आली. प्रशिक्षणार्थी म्हणून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर सहायक जिल्हाधिकारी म्हणून 11 जुलै रोजी रुजू झाल्या होत्या. त्यानंतरही त्यांची चर्चा झाली. वादग्रस्त प्रशिक्षाणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पूजा खेडकर यांनी वाशिमला पोहोचल्यानंतर पत्रकारांशी बोलताना, मला याविषयी काहीही बोलण्याची परवानगी नाही असं सांगितलं

वाशिम मध्ये पहिल्याच दिवशी त्यांनी जिल्हाधिकारी एस. बूवनेश्वरी यांची भेट घेऊन वाशिमच्या जलसंपदा विभागासह 12 जुलै रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांचं प्रशिक्षण घेतले. तर इथून पुढे त्या येत्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 15 ते 19 जुलै दरम्यान अकोला येथील आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून आठवडाभर कामकाज प्रशिक्षण घेणार आहे. त्याकरिता त्यांना अकोल्यात हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानंतर 22 जुलै पासून विविध शासकीय अधिकारी यांच्या भेटी घेऊन कामकाजाचा अनुभव घेणार असल्याचीही माहिती आहे.

पुणे येथील प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आल्या. बदली झाल्यानंतर त्या चर्चेत आल्या. पूजा खेडकर यांनी प्रबोशनमध्ये असताना विशेष अधिकारांची मागणी केली. त्यात लाल दिव्याची गाडी, व्हीआयपी नंबर प्लेट, खासगी ऑडी कारवर लावलेला महाराष्ट्र सरकारचा बोर्ड, अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी या सर्व प्रकारामुळे पूजा खेडकर या चांगल्याच चर्चेत आल्या. पूजा खेडकर यांची नियुक्ती, यूपीएससी परीक्षा देताना त्यांनी सादर केलेले दिव्यांग असल्याचे प्रमाणापत्र, नॉन क्रिमेलियरचे प्रमाणपत्र असे सर्वकाही संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. याच कारणामुळे त्यांची पुण्याहून थेट वाशिमला बदली करण्यात आली होती. आता पूजा खेडेकर या अकोल्यात असणार आहेत.