अकोला – दमदार पावसामुळे अकोला जिल्ह्यातील जल साठे ओसंडून वाहत आहेत. यामधील काटेपूर्णा (महान) व दगडपारवा धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. येत्या काही दिवस संततधार पाऊस राहिल्यास सर्व प्रकल्पात 100 टक्के जलसाठा निर्माण होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे. काटेपूर्णा प्रकल्पात 82.31 टक्के जलसाठा निर्माण झाला असून गेल्या 24 तासापासून या प्रकल्पाचे चार वक्र द्वार प्रत्येकी 30 सेंटिमीटरने उघडून 92. 23 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दगडपरवा प्रकल्पात 88.42 टक्के जलसाठा निर्माण झाला असून, या प्रकल्पाचे चार वक्रद्वार पाच सेंटिमीटर ने उघडून या मधून 16.40 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.