अकोला – राष्ट्रवादी काँग्रेसचे(अजित पवार गटाचे) आमदार अमोल मिटकरींच्या वाहनांची मनसेकडून तोडफोड झाल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. राजकीय नेत्यांकडून या प्रकरणात जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनीही आमदार अमोल मिटकरींवर टीका केली आहे. त्यांनी मनसे आणि आमदार मिटकरी यांची मिलीभगत असल्याचं म्हटलं आहे
मनसे पदाधिकारी जय मालोकार मृत्यू प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी मोठं भाष्य केलंय. मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि आमदार अमोल मिटकरी यांचं सर्व षड्यंत्र असल्याचं देशमुख म्हणाले. प्रसिद्धीसाठी हा सर्व राडा झालाय.. पंकज साबळे आणि मिटकरी हे चांगले मित्र आहेत.. साबळे मिटकरी यांचा वाढदिवस साजरा करतोय.. दरम्यान पुढ आपल्या नेत्यावर मिटकरिंनीं आरोप केले.. मग ‘मी आरोप करतो आणि तुम्ही तसं करा’ अशाप्रकारे दोघांनी षडयंत्र रचल्याच आमदार देशमुख यांनी म्हटले.. आमदाराच्या गाडीवर हल्ला होणं हे चुकीचं आहेय.. पण जिल्ह्यातील तरुण मुलगा गेलाय.. त्यानंतरही त्याला जोडून वेगळे फाटे फोडल्या जातायत.. हे चुकीचं होतंय.. आतातरी मिटकरींनी हे सर्व थांबवायला पाहिजे, अशी विनंतीही आमदार देशमुख यांनी केली. ते अकोल्यात जय मालोकार यांच्या कुटुंबियांची सात्वनं भेट घेण्यासाठी आले होते.. त्यादरम्यान त्यांनी हा सर्व षडयंत्र असल्याचा आरोप केलाय.