Akola Morning- Woman murdered while going for a walk
क्राईम

अकोला : ताथोड हत्याकांडातील आरोपीला अटक

अकोला : अकोला शहरातील सविता ताथोड यांची मंगळवारी हत्या झाली होती. सकाळी मॉर्निग वॉकवर फिरताना त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी मृतक महिलेचा शेजारी असलेल्या धीरज चुंगडे नामक आरोपीला अटक केली आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार आरोपी धीरज चुंगडे यांच्यात 2 महिन्याआधी किरकोळ वाद झाला होता. या वादात मृतक महिलेने आरोपीच्या आईच्या गालावर थापड मारली होती. या अपमानाची खुन्नस आरोपीने सविता यांना ठार मारून काढली.

आरोपीने थंड डोक्याने कट रचून सविता यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्या दैनंदिन कामावर लक्ष ठेवून होता.

दरम्यान मंगळवारी सविता ताथोड या पहाटे सहाच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत मॉर्निंग वॉक करिता गेल्या असता, त्यांच्या मागावर दुचाकीने गेला. संधी मिळताच आरोपी धीरजने घराच्या काही अंतरावरच असलेल्या मुख्य रस्त्यावर सविता ताथोड यांना अडवून गळा आवळला आणि खाली पाडले. आणि चाकूने त्यांच्यावर वार केले. त्यांच्यासोबत असलेल्या महीलेनी आणि तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने ताथोड यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने ताथोड यांचं डोकं रस्त्यावर आपटून त्यांना रक्तबंबाळ केलं. काही वेळातच सविता ताथोड यांचा मृत्यू झाला. यानंतर आरोपीने येथून पळ काढला होता.