ताज्या बातम्या

रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी आकाश हिवराळे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून सदैव विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत असते गेल्या अनेक वर्षांपासून अकोला जिल्ह्यातील व अमरावती विभागातील असंख्य विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आकाश हिवराळे यांनी अनेक यशस्वी आंदोलने केली.

त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, प्रवेश क्षमता वाढ,कोरोना काळात परीक्षा न घेता सरसकट पास करून देण्यासाठी ची यशस्वी मागणी नुकतेच कॅरी फॉरवर्ड संदर्भात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथील यशस्वी आंदोलन सर्व शाखेतील लाखो विद्यार्थ्यांना त्यामुळे सरसकट प्रवेश मिळाला.

महाविद्यालयिन निवडणुकीत विजयी होऊन जिल्ह्याचे राज्यात व देशात प्रतिनिधित्व करून विविध समस्या मांडणारे,११ व १२ विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश पद्धती साठी आंदोलन असे अनेक शालेय,उच्च व तंत्र शिक्षण ,वैद्यकीय शिक्षण अशा अनेक विद्यार्थ्यांच्या समस्यांना वाचा फोडणारे लढवय्या विद्यार्थी नेतृत्व आकाश गुलाबराव हिवराळे यांची रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या अकोला जिल्हाअध्यक्ष तसेच विदर्भ सरचिटणीस पदी निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीला मा.ना.रामदासजी आठवले (सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री भारत सरकार)यांची मान्यता असून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे व प्रदेश उपाध्यक्ष सचिन बनसोडे यांच्या वतीने नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यावर संपूर्ण जिल्हाभरातून विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून आपण अधिक जोमाने काम करून रिपब्लिकन चळवळ गतिमान करण्यासाठी कटिबद्ध राहू असे सांगण्यात आले.