सोलापूर : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल का, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन भागांमध्ये विभाजन झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील वाद संपुष्टात येण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींनी विठुरायाला साकडे घातले.आशाताई पवार यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले, “आज नवीन वर्षाच्या निमित्ताने विठुरायाला कुटुंबातील सर्व वाद मिटून पुन्हा गुण्यागोविंदाने राहण्याची प्रार्थना केली.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करत शरद पवारांपासून वेगळे झाले होते. या बंडामुळे पक्षात दोन गट तयार झाले – एक शरद पवार समर्थित गट आणि दुसरा अजित पवार गट. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावरून सुरु असलेल्या संघर्षामुळे पक्षाचे भविष्य अंधारात आहे. निवडणूक आयोगाने मुख्य पक्ष अजित पवार यांना दिला आहे. यावर चर्चा सुरू असतानाच पवार कुटुंबातील व्यक्तींनी वाद मिटवण्याचा सूर लावला आहे.