देश

एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी

विशाखापट्टनम – नवी दिल्लीहून विशाखापट्टणमला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला मंगळवारी रात्री उशिरा बॉम्बची धमकी मिळाली. मात्र, विशाखापट्टणममध्ये उतरल्यानंतर विमानाची तपासणी केली असता त्यात काहीही आढळून आले नाही. विशाखापट्टणम विमानतळाचे संचालक एस राजा रेड्डी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, दिल्ली पोलिसांना बॉम्बची धमकी देणारा फोन आला होता. या फ्लाईटमध्ये 107 प्रवासी होते. फोन कॉलनंतर पोलिसांनी विमान कंपनी आणि विशाखापट्टणम विमानतळाला अलर्ट केले. रेड्डी म्हणाले की, विमान लँडिंगनंतर तपासले असता हा खोटा कॉल असल्याचे आढळून आले.