अर्थ

जन्माष्टमीपूर्वी सोने-चांदी दरवाढीला लगाम

मुंबई – या आठवड्यात सोने आणि चांदीत नरमाईचे सत्र आहे. त्यामुळे जन्माष्टमीपूर्वी जन्माष्टमीपूर्वी सोने-चांदी दरवाढीला लगाम लागला आहे. त्यामुळे मौल्यवान धातूंना या आठवड्यात कमाल दाखवता आली नाही. सोने एकदाच 550 रुपयांनी वधारले. तर त्यात 670 रुपयांची घसरण आली. चांदी एकदाच हजार रुपयांनी वधारली. तर ती 300 रुपयांनी स्वस्त झाली. आठवड्याच्या सत्रात दरवाढीला लगाम लागल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर ग्राहकांना आनंदवार्ता मिळाली. आता अशा आहेत या मौल्यवान धातूच्या किंमती सोन्यात 700 रुपयांची घसरण जन्माष्टमीपूर्वी सोने आणि चांदीत नरमाई आली आहे. दरवाढीला मौल्यवान धातूंनी लगाम लावला. या आठवड्यात सोने 550 रुपयांनी तर चांदी एक हजारांनी वधारली. सोन्यात दरवाढीपेक्षा अधिक घसरण झाली. चांदी 300 रुपयांनी स्वस्त झाली.

या आठवड्यात सोने एकदाच 550 रुपयांनी वधारले. तर त्यात 670 रुपयांची स्वस्ताई आली. आठवड्याच्या अखेरच्या सत्रात 22 ऑगस्टला 380 रुपयांची तर 23 ऑगस्ट रोजी 170 रुपयांची घसरण झाली. 24 ऑगस्ट रोजी किंमतीत बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. या आठवड्यात 20 ऑगस्ट रोजी चांदी 1 हजार रुपयांनी वधारली होती. 21 आणि 22 ऑगस्ट रोजी चांदीत कोणताच बदल झाला नाही. 23 ऑगस्ट रोजी चांदी 300 रुपयांनी स्वस्त झाली. काल किंमतीत कोणताही बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,700 रुपये आहे.