नवी दिल्ली – इस्रायलच्या गाझा पट्टीमध्ये हमास आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह यांच्यासोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या नागरिकांसाठी एक ऍडव्हायझरी जारी केली आहे. तेल अवीवमधील भारतीय दूतावासाने इस्रायलमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळून सुरक्षित ठिकाणी राहण्यास सांगितले आहे.
ऍडव्हायझरीत नमूद केल्यानुसार भारतीय दूतावास संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच आपल्या लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी इस्रायली अधिकाऱ्यांसोबत काम करत आहे. दूतावासाच्या वतीने नागरिकांना सावध राहण्यास आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी ठरवलेल्या प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे. याशिवाय, आपत्कालीन परिस्थितीत, दूतावासाच्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्यास सांगितले आहे. दूतावासाने टेलिकम्युनिकेशनसह ईमेलही जारी केला आहे. तसेच ज्या भारतीयांनी दूतावासात नोंदणी केलेली नाही त्यांनाही एका लिंकद्वारे त्वरित नोंदणी करण्यास सांगितले आहे.