बई – पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेलपासून साडेपाच किलोमीटर अंतरावर खाजगी बस आणि ट्रॅक्टरचा अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. खाजगी बस आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघाली होती. अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. खाजगी बस डोंबिवलीहून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघाली होती.
डोंबिवली मधील दोन ते तीन गावामधून चार बस पंढरपूरकडे निघाल्या होत्या. त्यातील एक बसच्या पुढे ट्रॅक्टर जात होता. अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली आणि बस २० फूट खाली कलंडली, यात बसमधले प्रवाशी जखमी झाले. यात तीन भाविक जागीच ठार झाले तसेच दोन ट्रॅक्टर मधले प्रवाशी मृत पावले. तर बस मधले सात प्रवाशी गंभीर जखमी असून, त्याच्यावर कामोठे येथे एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत , तर ४२ भाविक किरकोळ जखमी झाले आहेत .