महाराष्ट्र

अमरावती लोकसभेत 63.67 टक्के मतदान

अमरावती – अमरावती लोकसभा मतदारसंघात भारत निवडणूक आयोगाने सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदानाची वेळ निश्चित केली होती. त्यानुसार सकाळी सात वाजतापासूनच मतदारसंघात मतदानाला उत्साहात सुरुवात झाले. मतदारांनी मतदानाची टक्केवारी वाढवून शासकीय जनजागृतीला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अमरावती लोकसभा मतदारसंघात अंतिम आकडेवारीनुसार सरासरी 63.67 टक्के मतदानाची नोंद झाली.

मतदानाची विधानसभा मतदारसंघनिहाय अंतिम टक्केवारी याप्रमाणे : बडनेरा मतदार संघात 55.78, अमरावती मतदार संघात 57.51, तिवसा मतदार संघात 64.14, दर्यापूर मतदार संघात 66.88, मेळघाट मतदार संघात 71.55, अचलपूर मतदार संघात 68.84 टक्के असे एकुण अमरावती लोकसभा मतदार संघात 63.67 टक्के मतदान झाले.लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणूकीत मतदान करताना अमरावती लोकसभा मतदारसंघात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. मतदारसंघात उत्सवात मतदारराजाने सक्रीय सहभाग घेत मतदान केले. मतदानाला ग्रामीण भागात भरभरुन प्रतिसाद मिळाला, तर शहरी भागातही मतदारांनी घराबाहेर पडून मतदानासाठी रांगा लावल्या. मतदारराजाने मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा मतदान जास्त प्रमाणात करुन प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली. दिलेल्या या प्रतिसादामुळे जिल्ह्यात उत्साहात मतदान पार पडले. सर्वत्र शांततेत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली.
……………………………………