मुंबई

अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एमबीबीएस च्या 100 जागा मंजूर

ठाणे – केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता एमबीबीएसच्या 100 जागांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे तसेच स्थानिक आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी विशेष प्रयत्न केले,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संतोष वर्मा यांनी दिली आहे. भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.