अकोला

१४ मार्चच्या संपात मंत्रालय भूमि अभिलेख संघटनेचा सहभाग

अकोला : कामगार नेते भारत वानखेडे प्रणित अनू.जाती.जमाती,विजा -भज,इमाव,विमाप्र शासकिय ,निमशासकिय अधिकारी कर्मचारी संघटना मंत्रालय शाखा भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य संघटनेची बैठक अकोल्यातील संघटनेचे कार्यालयात नूकतीच पार पडली.

जूनी पेन्शन योजना पूर्वरत सूरू करावी या मागणीसाठी १४ मार्च रोजी कर्मचारी संघटनांचे राज्यव्यापी संपाला पाठींबा असून सक्रिय सहभाग असल्याचा निर्णय यावेळी सर्वानूमते घेण्यात आला.बैठकिच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याध्यक्ष किशोर इंगळे तर प्रमूख अतिथी म्हणून संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शेषराव बोभाटे, राज्य उपाध्यक्ष रमेश तेलमोरे, राज्य महासचिव विशाल चराटे, राज्य महीला संघटिका अंजलीताई बनसोडे यांचेसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी राज्याध्यक्ष किशोर इंगळे आपल्या भाषणात म्हणाले कि जूनी पेन्शन मिळणे हा कर्मचा-यांचा संवैधानिक हक्क आहे, आपल्या या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रातील समस्त भूमि अभिलेख मधील अधिकारी वृंद व कर्मचारी बांधवांनी संपामध्ये मोठया संख्येने सहभागी होवून लोकशाही सनदशीर मार्गाने संप यशस्वी करावा असे आवाहन केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनीही संप यशस्वी करण्याचे आवाहन केले.बैठकिला भूमि अभिलेख संघटनेचे पदाधिकारी साहेबराव खंडारे,कूलदिप शिरसाट, विशाल वानखडे, संदिप गोपनारायण, मानिक खंडारे, वसंत शेगोकार, रवि इंगोले, वसंत गवारे , धांडे, एन ए तायडे, डि आर बोदडे यांचेसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.