arrest_1_910
क्राईम

सोलापूर : लाचखोर अभियंता जेरबंद‎

सोलापूर : डांबरीकरण झालेल्या‎ रस्त्याच्या कामाचे मोजमाप‎ पुस्तकावर सही केल्याचा मोबदला‎ म्हणून १३ हजारांची लाच मागितल्या‎ प्रकरणी महापालिकेतील सहाय्यक‎ अभियंता सुनील लामकाने (वय‎ ५७) यास लाच लुचपत प्रतिबंध‎ विभागाने ताब्यात घेतले.‎

महापालिकेच्या गलिच्छ वस्ती‎ सुधार योजना कार्यालयात ही कारवाई झाली.‎ शेळगी ते स्मशानभूमी येथील‎ रस्त्याचे काम केल्याचा मोबदला‎ म्हणून सहा हजार , बारामती बँक ते‎ आकाशगंगा मंदिर येथील रस्त्याचे‎ डांबरीकरणाबद्दल सही करण्यासाठी‎ ७ हजार असे १३ हजार लाचेची‎ मागणी यांनी केली होती.‎