अकोला

सायवणी येथे युवतीची गळफास घेवून आत्महत्या

प्रमोद कढोने

पातुर२३ऑक्टोबर :–अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात येत असलेल्या, चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सायवणी येथे २१ वर्षेय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दि.२२ ऑक्टोंबर रोजीच्या दुपारी उघडकीस आली आहे. गायत्री उर्फ मुन्नी शेषराव ताले २१ असे मृतक युवतीचे नाव आहे. युवतीने राहत्या घरात स्वयंपाक खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली असल्या बाबतची माहिती मिळताच चान्नी पोलिस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ, उपनिरीक्षक गणेश नावकार, सहाय्यक उपनिरीक्षक आदिनाथ गाठेकर, यांनी तत्काळ धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला, आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविण्यात आले, मृतक युवतीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार युवतीच्या लग्नासाठी वडिलांनी बँक व सावकाराकडून व्याजाने पैसे काढून शेतात सोयाबीन तूर या पिकांची पेरणी केली होती. परंतु अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने वडील कुठून पैसे आणतील आणि लग्न करतील या काळजीने युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा सुद्धा परिसरात आहे. याप्रकरणी पुढील तपास चान्नी पोलीस करीत. आहेत.