आकोट: आकोट को ऑप. जिनिंग ऑन्ड प्रेसिंग फॅक्टरीच्या अध्यक्षपदी सहकार पॅनलचे सुभाषराव वानखडे यांची तर उपाध्यक्षपदी रामदास थारकर यांची अविरोध निवड करण्यात आली. या निवडीचे संस्थेच्या भागधारक शेतकरी व सहकार कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त होत आहे.
संस्थेच्या कार्यालयात नवनिर्वाचित संचालकांचे पहिल्या समेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. सभेला सुभाष वानखडे, मनोहरराव गये, ललित बहाळे, डॉ. राजेश नागमते, भास्करराव काळंके, रामदास थारकर, ताहेरऊल्ला खां पटेल, वामनराव बानेरकर, मनोज बोंद्रे, निलेश पाचडे, रुपराव म्हसणे, पुरुषोत्तम मुरकुटे, सौ. रमाताई ग. गावंडे व सौ. मंगलाताई वि. पांडे, कैलास कवटकार, गजानन डांगे अभिजित अग्रवाल, डा? नंदकुमार थारकर, राजेश पुंडकर देविदास कराळे गजानन पुंडकर उपस्थित होते.
निवडणूक अधिकारी म्हणून सहकार अधिकारी एम के विखे यांनी कामकाज पार पाडले. संस्थेचे व्यवस्थापक राजेश सांगोले यांनी त्यांना सहकार्य केले. सहकार परिवाराच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष वानखडे यांचा जेष्ठ सहकार नेते हिदायत पटेल यांचे हस्ते तर उपाध्यक्ष रामदास थारकर यांचा नानासाहेब हिंगणकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. सहकारी जिनिंगच्या निवडणूकीत संस्थेच्या भागधारक मतदारांनी भरभरून मत देवून जो विश्वास दाखविला तो विश्वास सार्थकी ठरविण्यासाठी नविन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांनी मानले.
संस्थेचा विकास करावा अशी अपेक्षा सहकार परिवाराचे अध्यक्ष नानासाहेब हिंगणकर यांनी व्यक्त करुन नवनिर्वाचित पदाधिका-यांना शुभेच्छा दिककल्यात हिदायत पटेल, ललित बहाळे, गजानन पुंडकर यांनी नविन पदाधिकारांचे अभिनंदन करून संस्थेला गतवैभव प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
या प्रसंगी तालुका ख.वि.स.चे उपाध्यक्ष शेषराव वसू, रमेश खलोकार, विजयराव रहाणे, कपिल ढोके, सुभाष मगर, पुर्णाजी गावंडे, प्रशांत पाटील, दयाराम धुमाळे, गजाननराव पाचडे, देविदास बुले, भालश्चंद्र फोकमारे, अरुण जवंजाळ, नंदकिशोर हिंगणकर, बाळासाहेब फोकमारे, विजय पांडे, दिपक वानखडे, गजानन डाफे, नंदकिशोर भांबुरकर, आनंद पाचबोले, घनश्याम बिजवे, नाजीम पटेल, तस्लिम पटेल, निलेश हांडे, विजयेंद्र तायडे, नरेंद्र वानखडे गणेशराव वानखडे, बाबा जायले, फरिदभाई, संतोष पुंडकर, जावेद पटेल, जसराज बहाळे, डिंगाबर तायडे, लक्ष्मण वानखडे, अभिजित वानखडे, आशुतोष वानखडे आदीसह सहकार कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी जिनिंगचे संचालक डॉ. राजेश नागमते यांनी सर्वांचे आभार मानले.