democracy
संपादकीय

संपादकीय : लोकशाहीचे खांब एकाच बाजुने झुकले

भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून भारतीय लोकशाही ला खुप मोठा इतिहास सुध्दा आहे. भारतीय लोकशाही ही चार स्तंभावर उभी आहे. आणि या चार स्तंभामुळे करोडो जनता लोकशाहीच्या छताखाली सुरक्षित असते. ते चार स्तंभ म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आवाज असत. चारही स्तंभाला विषेश स्वातंत्र्य दिले आहे. आणि याच मुळे प्रत्येक जन आपापले काम निष्पक्ष आणि निडरपणे करू शकतात.

परंतु आजची परिस्थिती बघितली तर लोकशाहीचे चारही खांब झुकलेले आहेत. आणि ते एकाच बाजुने झुकल्याने लोकशाही पुर्णपणे धोक्यात आलेली आहे. लोकशाही मध्ये कोणत्याही एका पक्षाचे, एका नेत्याचे वर्चस्व निर्माण होऊ नये अशी तरतूद असताना ही आज एकाचेच वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि हीच बाब लोकशाही साठी सर्वात घातक आहे. लोकशाहीचे खांब एकाच बाजूने झुकले तर त्या देशातील संविधान फक्त नामधारी होते याची जाणीव लोकांना असणे आवश्यक आहे.

लोकशाही मध्ये विरोधी पक्ष हा मजबूत पाहिजे असतो परंतु आज विरोधी पक्षच शिल्लक राहीलेला दिसत नाही. जेथे विरोधी पक्षच मजबूत नसेल तेथे लोकशाही आहे असे म्हणणे म्हणजे फक्त स्वतः च स्वतः ची पाठ थोपटणे होय. लोकशाही मध्ये सर्वात महत्वाचा खांब असतो तो म्हणजे लोकसभा/विधानसभा. लोकसभा किंवा विधानसभा मध्ये जनता आपले प्रतिनिधी प्रत्यक्ष निवडून देते. निवडून दिलेला प्रतिनिधी वा चारही खांबा अंतर्गत येणारे सर्व घटक हे जनसेवक असतात हि बाब आज जनताच विसरून चालली आहे.

जे लोक प्रतिनिधी आपण निवडून देतो त्या प्रतिनिधींनी जनतेची जसे शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि महागाई संदर्भातील कामे करावी व समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, आणि न्याय प्रस्तापित करावा हीच प्रमुख कार्ये जनप्रतिनिधींची आहेत. आता आपण समाजाचा विचार केला तर शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि महागाई वर बोलणारे कोणीच राहीले नाही. सरकार तर बोलत नाही पण विरोधी पक्ष किंवा जे स्वतःला जनतेचे नेते समजतात ते कोणीच बोलत नाही आहेत.

प्रस्थापित सरकारला तर लोकशाही आणि लोकशाही च्या माध्यमातून संविधानच मान्य नाही आहे. म्हणून प्रस्थापित सरकार शिक्षण, आरोग्य, रोजगार महागाई यावर न बोलता भलतेच जे विषय जनतेच्या फायद्याचे नाहीत आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याला तडा जाणारे मुद्दे समोर केले जातात आणि स्वतः ला विरोधी किंवा जनतेचे नेते समजले जाणारे त्यांना उत्तरे देत बसतात. जसे सरकार पुरस्कृत लोक धर्म, रंग, इतिहास या बद्दल चुकीचे विधान करतात आणि विरोधी पक्ष, नेते, त्यावर प्रतिक्रिया देत बसतात.

थोडक्यात काय तर जनहीतावर बोलण्या ऐवजी निष्फळ विषयावर चर्चा करून मुळ विषयापासून जनतेला दुर नेत आहेत. म्हणून सत्ताधारी असो वा विरोधक अजेंडा मात्र एकच राबवत आहेत. वेगवेगळ्या शक्तीचा वापर करून अनेक छोट्या मोठ्या पक्षांना नेत्यांना कमळाकडे आकर्षित केले जात आहे. अनेक नेते तिकडे जाऊन मला स्वतःला काही मिळेल म्हणून हातमिळवणी करत आहेत. मग जनतेचा विश्वास, विचारधारा सर्व पायदळी तुडवल्या जात आहे.

जे लोक जनतेचे विचार आणि विचारधारा पायदळी तुडवतात ते नेते ते लोक लोकशाही कशाच्या आधारावर टिकवतील हा खूप मोठा प्रश्न आहे. प्रत्येक नेत्याचे काही भक्त सुद्धां निर्माण झालेले आहेत. आमचा नेता जे काही करतो ते बरोबरच आहे ओरडून ओरडून सांगणारे भक्त लोक त्यांच्या नेत्यांबद्दल शब्दही बोलु देत नाहीत. जर जनतेला नेत्याबद्दल बोलतच येत नसेल तर लोकशाही मजबूत आहे असे म्हणजे मुर्खपणाचे आहे.

नेत्यांना डोक्यावर घेऊन नाचणार्‍या लोकांनी एकच विचार करावा आपण ज्याला नेता माणतो तो काहीच काम करत नाही. तरी त्याच्या कडे अनेक शहरात मोठमोठे बंगले असतात. दरवर्षी नवनवीन गाड्या, नेत्यांचे मुलं शाळेतच असतात पण कमाई करोडो रुपयांची, निवडणुकी मध्ये करोडो रुपये खर्च होतात तो पैसा येतो तरी कुठुन याचआ विचार करणे आवश्यक आहे.

कार्यकर्ते पक्षाचे एकनिष्ठ काम करतात, मेहनत करून पोट भरतात तरीही साध घर बांधले जात नाही, नेत्याचे मुल विदेशात शिकायला जातात आणि कार्यकर्त्यांच्या मुलांना रिक्षाने जायला पैसे नसतात. राजकीय नेत्यांकडे एवढा पैसा येतोच कसा? लोकशाही मध्ये जनसेवक मालामाल आणि जनतेचे हाल असतील तर त्याला लोकशाही म्हणायचे का प्रश्न आहे.

जागृत नागरिकांनी नेत्यांना एकच प्रश्न विचारायला पाहिजे शिक्षण सुरू असताना तुमचे मुलं करोडो रूपये कमवतात तर ने नेमकं काम तरी काय करतात. तेच काम करून कार्यकर्ते किमान चांगल्या पद्धतीने उदरनिर्वाह तरी करतील. दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकाचे पण अति महत्वाचे समजले जाणार्‍या खांबाला तर सरकारच निपक्ष काम करू देत नाही याचे अनेक उदाहरणे आहेत.

न्यायालयातील न्यायधिशांना बरोबर काम करू दिले जात नाही, एक्झिक्युटिव्ह बॉडी ला स्वतंत्र पणे काम दिले जात नाही. म्हणून तर आज लहान लेकराला सुद्धां ED चे नाव माहिती झाले आणि ED ची धाड सरकारमध्ये असलेल्या नेत्यांच्या घरावर पडत नाही अशा प्रकारचा आवाज जनतेमधुनच येत आहे.

जनतेला याही पुढचे माहिती आहे ज्यांच्या वर ED धाड पडली आहे, किंवा पडणार आहे असे जर कमळाकडे गेले तर ED पासून संरक्षण मिळते. हा आवाज सर्व सामान्य माणसाचा आहे. आणि हाच आवाज सरकार पर्यंत पोहचवण्याची जबाबदारी असते ती म्हणजे मिडियाची.

परंतु आज आपण बघितले तर काही प्रिंट मिडिया चांगले काम करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना मोठ होऊ दिले जात नाही. आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया बघितला तर जनतेचा आवाज सरकार पर्यंत पोहचवण्याची नैतिक जबाबदारी असताना सरकारचा आवाज जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम इलेक्ट्रॉनिक मिडिया करत आहे.

कोणताही मिडिया असो लोकशाही मध्ये त्याची भुमिका विरोधी पक्षाची असती. परंतु आजचा मिडिया सत्ताधारी असल्याचे दिसून येत आहे. सरकार चा अजेंडा इलेक्ट्रॉनिक मिडिया राबवत आहे आणि जनतेचा आवाज जनतेमध्येच दाबल्या जात आहे. मिडिया ला सुद्धां आज धर्म आणि रंग अधिक प्रिय वाटत आहे.