अकोला : जुने शहरातील श्री संत गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट डाबकी रोड येथे १५ मार्च रोजी मंदीर प्रांगणात शिव मंदिराची निर्मीती करण्यात आली. या मंदिरात शिवलिंग तसेच नंदीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून या सोहळ्यानिमीत्त ट्रस्टतर्पेâ विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमीत्त बुधवारी सकाळी ८ वाजता वाजता भजन, कीर्तनाच्या गजरात श्रीराम नगर व मनोरथ कॉलनी येथून कलश यात्रा काढण्यात आली. या दिंडी सोहळ्यात भाविकांचा उस्पूर्त प्रतिसाद मिळाला. या कलश यात्रेनंतर विधिवत होम हवन कार्यक्रमासह मुर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास प्राणप्रतीष्ठा व महाआरती, प्रसाद वितरण आदी विविध कार्यक्रम संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन विनायक खोत,अजाबराव उजाडे, गजानन राठोड यांनी केले. यावेळी रंजना विंचनकर, श्याम विंचनकर,माधुरी क्षीरसागर,सुनील उंबरकर, बोदडे प्रामुख्याने उपस्थित होते. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी गजानन खारोडे,अनिल चौधरी, राजेंद्रकुमार झटाले, सुनील धामनीकर, विशाल लोडम,रमाकांत बाहेकर,काकडे काका, सुभाषमामा म्हैसने,अनुप खोत, सुधीर उजाडे, अमोल देवधर, डीक्कर काका, वैभव गोडले, परभणीकर,सुधाकर वानेरे, मनोज खापेकर, राकेश सूर्यवंशी, अमित सोनोने, जी.एस. दुबे, पवन चंदेल, प्रशांत, शरद मिश्रा, देव ठाकरे व मातृशक्तीने प्रयत्न केले.