sanjay-raut
अमरावती

संजय राऊतांच्या वक्तव्याविरोधात अमरावतीत जाहीर निषेध

अमरावती, 23 फेब्रुवारी : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ठाण्याचे खासदार श्रीकांत शिंदेंनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूरला सुपारी दिली असा खळबळजनक आरोप केला होता.या पत्राचे पडसाद आता अमरावती जिल्ह्यात उमटायला सुरुवात झाली असून शिवसेना तर्फे जाहीर निषेध केला जात आहे.

दर्यापूर येथील शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी आज संजय राऊतांनी केलेल्या आरोपा विरुद्ध जोरदार नारेबाजी करीत दर्यापूर पोलीस ठाण्यात तक्रार निंदविली. तर अमरावती शहरातील शिवसेनेने संजय राऊत यांचा पुतळा जाळत सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संजय राऊत सारख्या कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याच्या प्रयत्नात असणा-या नालायक नेत्याचा संपुर्ण महाराष्ट्र निषेध करित आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटिल अरबट, सहसंपर्कप्रमुख रवींद्र गणोरकर तालुकाप्रमुख महेंद्र भांडे. सुनील केने ,उपतालुकाप्रमुख मनोज गव्हाणे ,पंजाबराव नागे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.