अकोला: बार्शीटाकळी येथील खरेदीविक्रीसंघाच्या व्यवहारावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत, त्याची चौकशी करण्यासाठी बार्शीटाकळी तालुका वंचित बहुजन? आघाडी पार्टीचे ता. प्रसिद्धी प्रमुख मिलींद करवते यांच्या नेतृत्वात तहसीलदार आणि खरेदी विक्री संघाचे सहाय्यक यांच्याकडे ‘वंचित’कडून निवेदन सादर करण्यात आले.
निवेदना नमुद असल्याप्रमाणे बार्शीटाकळी येथे खरेदी-विक्री संघाद्वारे तालुक्यातील शेतकर्यांकडून हरबरा, तूर इतर वाणांची खरेदी केली जाते. शेतकर्यांकडून सर्व कागदपत्र तपासले जातात. पण खरेदीची पोहोचपावती दिली जात नाही.शेतकर्यांना अनुदानापासून वंचित ठेवले जाते. खरेदीविक्री संघाचा हा कारभार मनमानी युक्त आहे.
याची चौकशी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रसिद्धी प्रमुख मिलिंद करवते, आनंद मते, गोबा शेठ, सलीम, अनिल खंडारे, विश्वनाथ खंडारे, गणेश, साहिल गवई, सुशांत वनारे, दशरथ मते, रवींद्र खंडारे, सुनिल टिकार, दिनकर वनारे, देविदास खडे, धनंजय काकड उपस्थित होते.