अकोला

शेतकरी युवा पुत्राची कर्जाला कंटाळून विष पीऊन आत्महत्या.

अजय प्रभे:-मूर्तिजापूर प्रतिनिधी

मूर्तिजापूर२०नोव्हेंबर – मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत हिरपूर अंतर्गत येत असलेल्या मौजे साखरी येथील रहिवाशी युवा शेतकरी प्रवीण बाबुलाल पोळकट  वय ३२ वर्ष यांनी कर्जाला कंटाळून शेतात दिनांक १८ नोव्हेंबर ला दुपारी ४ वाजताच्या विष प्राशन केले होते.दरम्यान त्याला उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले होते.उपचारादरम्यान अकोला येथे १९ नोव्हेंबर च्या रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.सदर युवकाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईल मधून एक एक व्हिडिओ क्लीप प्रसारित केली होती क्लीप मध्ये म्हटल्याप्रमाणे त्याच्यावर को. ऑप बँक तसेच महिंद्रा कोटक कंपनी मार्फत ट्रॅकर खरेदी केला होता व सततच्या नापिकीमुळे ट्रॅकरचे हप्ते थांबले असल्याने ट्रॅक्टर फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीनी घरून ओढत नेला आहे फायनान्स कंपनीला दोषी ठरवत आपण आत्महत्या करत असल्याचे क्लीप मध्ये म्हटले आहे त्याच्या मागे पत्नी, दोन मुली,आई वडील असा परिवार आहे.आई नेहमी आजारी राहत असून वडील हे कँसर रुग्ण आहेत याबाबत सामाजिक कार्यकर्ते सचिन तराळ यांनी माहिती दिली.