shivaji-vidyalaya-akot
अकोला

शिवाजी विद्यालयात गाडगे महाराज जयंती साजरी

अकोट : स्थानिक श्री शिवाजी विद्यालयात गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य एस जी वालसिंगे तर प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षक आर एम सावरकर व ए.व्ही. गावंडे,शिक्षक प्रतिनिधी सुभाष चौधरी ज्येष्ठ शिक्षक ए.डब्ल्यू कुलट,यु.एन देशमुख, एस जी मानकर, एम आर धोटे ,डी. जी. हिंगणकर,आर एस चिकटे, एम एस रोकडे ,जी. पी. इंगोले, एस एस कराळे, सुजितभाऊ येवतकर यांची होती.

सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व शिक्षण महर्षी भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्याचे व गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य एस जी. वालसिंगे यांनी गाडगे महाराज यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे संचालन आर एस चिकटे यांनी तर आभार प्रदर्शन एम एस रोकडे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते