क्राईम

विवाहबाह्य संबंध,८वर्षाच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतले!

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना!
अकोला प्रतिनिधी:-८ऑगस्ट अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मौजे वाडी(अदमपूर) येथे एका विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेच्या प्रियकराने तिच्या ८वर्षाच्या चिमुकल्याच्या हत्त्या केली.ही घटना अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मौजे वाडी(अदमपूर)येथे ८ऑगस्ट रोजी रात्री उशिरा घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेल्हारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वाडी(अदमपूर)येथे आदिवासी समाजाची सोनाली राजू कुमरे,ही३०वर्षीय महिला पती सोबत पटत नसल्याने, आपल्या दोन मुलांना घेऊन राहत होती.आणि उदरनिर्वाहासाठी एका खाजगी कंपनीत कामाला होती.याच कंपनी मध्ये आरोपी संजय शामराव नवलकार वय ३२वर्षे हा सुद्धा त्याच्या पत्नी सोबत पटत नसल्याने पत्नी पासून वेगळा राहत होता. योगायोगाने दोघेही एकाच ठिकाणी कामाला असल्याने, त्यांचं सूत जुळलं, आणि दोघेही सोबत राहू लागले. कंपनी मध्ये त्यांना योग्य मजुरी मिळत नसल्याने ते वाडी येथे राहण्यासाठी आले,आणि उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करीत होते. ८ऑगस्ट रविवारी सोनाली ही मजुरीने शेतात काम करण्यासाठी गेली होती. घरी आरोपी संजय नवलकार आणि मयत चिमुकला वेदांत आणि त्याची थोरली बहीण श्रावणी हे होते.आरोपी संजयला दारूचे व्यसन असल्याने तो रविवारी खूप दारू पिलेला होता,अशी माहिती आहे.अशातच संजय समोर मयत वेदांत याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्लास पिण्याच्या माठात टाकला याचा राग संजयला आल्याने,त्याने लाकडी रापटरने मारहाण केली. आरोपी एवढ्यावरच न थांबता आरोपीने वेदांतच्या छातीत जोरात दगड मारला, त्यातच ८वर्षाचा वेदांत गतप्राण झाला.हा प्रकार सुरू असतांना वेदांतची श्रावणी बहीण, आरोपीला आवरण्याचा प्रयत्न करीत होती,पण तिला सुद्धा न जुमानता संजयने हे कृत्य केले.८वर्षाच्या वेदांतची अशी निर्दयपणे हत्त्या केल्याने समाजमन सुन्य झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तेल्हारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले, वेदांतच्या आईने दिलेल्या तक्रारी वरून आरोपीला अटक करण्यात आली असून, खुनाच्या गुन्ह्यासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत.