राजकीय

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या आक्रमक भूमिकेनंतर बोगस खत उत्पादन करणाऱ्या कंपनीवर कारवाईची कृषीमंत्र्यांची घोषणा

मुंबई – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर राज्यात बोगस खत उत्पादन करणाऱ्या कंपनीवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा कृषीमंत्र्यांनी आज परिषद सभागृहात केली.

विश्व खत उत्पादक संघटनेने नांदेड येथील श्री महाराष्ट्र फर्टीलायझर्स अँड केमिकल या महाउद्योग ब्रँड कंपनीने बोगस खत उत्पादक करणाऱ्या कंपनीवर कारवाईची मागणी कृषी आयुक्तांकडे केली होती. मात्र त्यावर कारवाई न करता उत्पादकावर कारवाई करू नये, असा दबाव कृषिमंत्री यांच्या स्वीय सहायक यांनी टाकल्याची माहिती मिळाल्याचे दानवे यांनी सभागृहात म्हटले.

त्यावर कृषीमंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्याचे नाव व पुरावे दिल्यास त्यावर कारवाई करण्याची तयारी दर्शवली.

बोगस खताची किंमत १२ हजार प्रति टन तर सरकारच्या खताची किंमत २२ हजार ५०० रुपये इतकी आहे. याबाबत तफावत का? खताचे दर १२ हजार करण्यासाठी सरकार काय भूमिका घेणार असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.

तसेच नांदेडच्या बोगस खत उत्पादक कंपनीला नोटीस दिली असून चौकशी सुरू असल्याचे कृषिमंत्री यांनी उत्तर दिले.