अकोला

विनोद मानकर यांची तालुका सरपंच संघटनेच्या महासचिव पदी फेरनिवड

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर तालुका सरपंच संघटनेच्या महासचिवपदी पारद चे सरपंच विनोद मानकर यांची बिनविरोध फेरनिवड झाली आहे. आधीच्या कार्यकारिणीत विनोद मानकर महासचिव होते. त्यांनी त्यावेळी सरपंचांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. सर्वांना न्याय दिला.

ही त्यांची न्याय्य कारकीर्द विचार घेऊन सर्व सरपंचांनी त्यांना पुन्हा या पदावर विराजमान केले. या निवड सभेत उपस्थित सर्व ८६ सरपंचांचे आभार मानून आपल्या या दुसर्‍या कार्यकाळात सर्वांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

त्यांचे सर्वत्रअभिनंदन होत आहे.यावेळी मुर्तिजापूर तालुका संघटनेचे अध्यक्ष संतोष गवई, उपाध्यक्ष बंडु भाऊ घाटे,माना सरपंच जमील अहमद कुरेशी,हातगाव सरपंच अक्षय राऊत,हिरपूर सरपंच अमोल गढवे,कुरुम सरपंच अतुल वाट,पोही सरपंच किशोर नाईक,दीपक वानखडे,रामेश्वर मुगल,कृष्णा गावंडे,सुमेध अंनभोरे, मुरंबा सरपंच अखिल भटकर,बोर्टा सरपंच पंकज सावळे, वैभव कोरडे,गोपाल बोडें,प्रदीप फुके,पदमा चंद्रमणी वानखडे,गीता सुनील पवार, पूजा आनंद बांगड, विजयाताई सुधाकर पाथरे, कविता सुनील मोहोड यांच्यासह महिला सरपंच तथा सरपंचाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.