palash-flower
अकोला ताज्या बातम्या

वसंत ऋतूची चाहूल; रंगोत्सवासाठी बहरला पळस

अकोला: रंगपंचमी आनंदाचा, उत्साहाचा सण. रंग उधळत साजरा होणारा हा सण. होळी पेटल्यानंतर साजरा होणार्‍या या रंगपंचमीच्या पर्वावर निसर्गातही रंगोत्सव साजरा होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. पूर्वी धुलीवंदनाला एकमेकांच्या अंगावर रंग टाकण्यासाठी लागणारारंग हा पळसाच्या फुलांपासून तयार केला जात होता.

आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून याचाआजही वापर होत आहे. पळसाची फुले पाण्यात टाकून स्नान केले, तर त्वचारोग नाहिसेहोतात, असे आयुर्वेदात सांगितले आहे. पळसाच्या बियांचा ही औषधीसाठी वापर केला जातो.अशा बहुगुणी वृक्षाच्या फुलांकडे लक्ष जाताच डोळ्यांना भुरळ पडते आणि सुखद अनुभूतीही येते. सद्य:िस्थतीत वाढत्या उन्हासोबतच रानावनासह अनेक ठिकाणी पळस वृक्ष लाल- तांबड्या फुलांनी अधिकाधिक बहरत चालल्याचे दिसून येत आहे.शिशिराची थंडी ओसरण्यास सुरुवात झाली, पानगळीने उघडी पडलेली वृक्षराजी नव्या पालवीचे लेणे अंगावर मिरवायला लागली की वसंताची चाहूल लागते.

या वसंतात केवळ रंगाची उधळण असलेला रंगोत्सव सुरू होतो. निसर्गाच्या शिशिरात बोडक्या झालेल्या शेत शिवाराला केशरी- लाल रंगात न्हाऊ घालणारा सर्व बाजूंनी नटलेला पळस सद्य:िस्थतीत चोहीकडे पाहावयास मिळत आहे. पळसाची पाने आकाराने मोठी असल्याने पूर्वी त्यापासून पंगतीला जेवण देण्यासाठी पत्रावळ्या आणि द्रोण तयार केले जात असत.

बदलत्या काळानुसार पत्रावळीला पर्याय मिळाल्याने पळसाच्या पत्रावळ्या मागे पडल्या. मात्र, त्यांचे महत्त्व कमी झाले नाही.ऋतूराज वसंत वर्षभरात वैशाखात येणारा ग्रीष्म, आषाढात येणारा वर्षा ऋतू, भाद्रपद महिन्यात शरद, तर फाल्गुन महिन्यात डोकावणारा आणि चैत्रात बहरणारा वसंत असे ऋतू असतात.यातील वसंताला ऋतुराज मानले जाते. कारण याच काळात हिरवळ बहरते, झाडांना नवी पालवी फुटत असल्याने वसंतात सर्जनशीलतेला वाव असत