प्रमोद काधोने,पातुर18जुलै :– पोलीस स्टेशन अंतर्गत एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांनी मालखाण्यातून 22 लाखा रुपये किमतीचे एका गुन्ह्यात जप्त केलेले चंदन व पोलीस कर्मचाऱ्यांचा पगार आरडी व काही सागवानाची अपहार केल्याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी दिलीप तिवारी याच्या विरोधात पातूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पातूर शहरात 1992 मध्ये आंध्र प्रदेश मधून ट्रक द्वारे चंदनाची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून मोठी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी एक ट्रक चंदन वनविभागाने जप्त करून पातूर पोलीस स्टेशनच्या मालखान्यात ठेवले होते सदर जप्त केलेले चंदन अंदाजे किंमत 22 लाख रुपये हे मालखान्यात ठेवण्यात आले होते मालखाना हेड दिलीप तिवारी यांच्याकडे 2012 ते 2018 या कार्यकाळात मालखाण्याची जबाबदारी व मालखाना म्हणून जबाबदारी होती या कार्यकाळात पातूर पोलीस स्टेशन मालखान्यातून
जप्त असलेले चंदनाची विल्हेवाट लावली 28 लाख रुपयाचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.या सोबतच पोलीस कर्मचाऱ्यांचे आरडी वेतनाचे पैसे सुद्धा अपहार झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच वनविभागाने जप्त केलेले सागवान सुद्धा त्यांच्या मालखान्यातून गायब झाले असल्याचे समोर आले आहे या सर्व प्रकरणात तात्कालीन पोलीस कर्मचारी दिलीप तिवारी यांनी मालखाण्याची जबाबदारी असताना व हेड कॉन्स्टेबल या पदावर सन 2012 ते 2018 या कार्यकाळात 28 लाख रुपयांचा अपहार केला चार आरोप विभागीय चौकशीत समोर आले आहेत. सदर विभागीय चौकशी मुर्तीजापुरचे उपविभागीय अधिकारी राऊत यांच्यामार्फत करण्यात आली होती पातूर पोलीस स्टेशनच्या मालखान्यातूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात चंदन व सागवान गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात चंदन व सागवान बाहेर गेले त्याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे पातूर पोलीस स्टेशनचे तात्कालीन मालखाना पातूर अधिकारी पोलीस कर्मचारी दिलीप तिवारी यांच्या कार्यकाळात हा अपघात झाल्याचे समोर आल्याने उपविभागीय अधिकारी यांच्या चौकशीनंतर सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी दिलीप तिवारी यांच्या विरोधात पातूर पोलीस स्टेशनमध्ये कलम 409 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या काही महिन्या अगोदरच दिलीप तिवारी हे पातुर पोलीस स्टेशन मधून सेवानिवृत्त झाले आहेत याप्रकरणी पुढील तपास मुर्तीजापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहे.कटात कोण कोण सहभागी याची चौकशी होणे गरजेचे
पातूर पोलीस स्टेशन मधून 1992 मध्ये वन विभागाने जप्त केलेले एक ट्रक चंदन पातुर पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे पोलीस स्टेशनच्या मालखान्यातून गायब झाले या याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी यांच्या वर गुन्हा दाखल झाला असला तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात चंदन व सागवान पोलीस स्टेशनच्या आवारातून बाहेर कसे गेले हे एक कोड आहे. एवढा मोठा अपहार एकट्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केला की यामध्ये अजून कोणी अधिकारी सहभागी होते याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे या प्रकरणातील आरोपी दिलीप तिवारी हे फरार असले तरी त्यांच्या अटकेनंतर या गटात पोलीस विभागातील अजून किती अधिकाऱ्यांचे हात ओले झालेले आहेत हे समोर येणार आहे.पातुर पोलीस स्टेशनचे सेवानिवृत्त कर्मचारी दिलीप तिवारी यांनी मालखान्यामधून चंदन सागवान व कर्मचाऱ्यांचे काही वेतनातील पैसे असा एकूण 28 लाखाचा अपहार केल्याचे विभागीय चौकशीत समोर आले असून याप्रकरणी पातूर पोलीस स्टेशनला दिलीप तिवारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तिवारी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे.
-अरविंद पवार हेड कॉन्स्टेबल पातूर पोलीस स्टेशन