lampi लम्पी
राजकीय

लम्पी आजारात औषध उपचारांचा शंभर टक्के खर्च राज्य सरकारने केला

पशुधनाचे मोफत लसीकरण करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : पशुधनाचे मोफत लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असून लम्पी आजाराच्या औषध उपचारांसाठीचा १०० टक्के खर्च राज्य सरकारने केला आहे, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली.

महाराष्ट्र राज्यात एकूण 150 कोटी एवढे पशुधन आहे. लम्पी आजारामुळे 4 लाख 69 हजार पशुधन बाधित झाले होती. त्यापैकी चार लाख 27 हजार पशुधन बरे झाले. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे लम्पी आजारामुळे पशुधन दगावलेल्या पशुपालकांच्या खात्यावर 70 कोटीची मदत राज्य शासनाने केली, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

दुग्ध उत्पादकांना आधार देणारी महानंद अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ बंद करून चालणार नाही, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. यासाठी दुग्धविकास आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. महानंदा चालविण्याबाबत एनडीडीबीला विनंती केली असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

राज्यात गोसेवा आयोगाची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली असून राज्यात गोशाळांना अनुदान वितरणाची जबाबदारी गोसेवा आयोगाच्या माध्यमातून केली जाईल, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.