अकोला: चाळीसगाव येथील रंगगंध कलासक्त न्यासाच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्व. पुरुषोत्तम दारवेकर स्मृती अभिवाचन महोत्सवात महानगरातील अभिवाचन चमू द्वितीय पारितोषकाची मानकरी ठरली.
अंतिम फेरीत महानगरातील अ.भा. मराठी नाट्य परिषद मलकापूर अकोला शाखेच्या वतीने सादर केलेल्या बाईच्या कविता या अभिवाचना ला द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यात आला. कवी किरण बेले यांच्या बाईच्या कविता या काव्यसंग्रहातील निवडक कवितांना बालचंद्र उखळकर यांचे रसग्रहणात्मक गद्य निवेदन जोडून तयार केलेली गद्य पद्य संहिता या स्पर्धेत सादर करण्यात आली होती.
यात बालचंद्र उखळकर यांच्या सादरीकरणाच्या दिग्दर्शनालाही द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले. राज्यात २६ ठिकाणी या संदर्भात प्राथमिक स्पर्धा घेण्यात आली होती. यात अंतिम फेरीसाठी २६ संघाची निवड करण्यात आली होती.
यात बाईच्या कविता सहिता प्राथमिक फेरीच्या चमू मधून प्रथम क्रमांक घेऊन अंतिम फेरीत दाखल झाली होते. उखळकरांच्या दिग्दर्शनातील अभिवाचनाची अंतिम फेरीत पोहोचण्याचे हे तिसरे वर्ष असून याही वर्षी दोन पारितोषिके प्राप्त करून या माध्यमातून त्यांनी महानगराचा सन्मान वाढविला आहे.