sri-ravishankar
अकोला

राजराजेश्वर नगरीत गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे आगमन

अकोला: आर्ट ऑफ लिविंगचे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे राजराजेश्वर नगरीत सोमवार दि २७ फेब्रुवारी रोजी दुपारी आगमन होत आहे.आ.वसंत खंडेलवाल यांच्या पुढाकाराने स्थानीय गीता नगर परिसरात शक्तिधाम सेवा समितीच्या निर्माणाधिन शक्तीधाम वास्तुच्या गर्भगृहाचा पावन शिलान्यास सोहळा गुरुदेवांच्या हस्ते पार पाडण्यात येणार आहे.

या कार्यक्रमा नंतर गुरुदेवांचे सायंकाळी ६ वाजता गोरक्षण रोड परिसरातील गोरक्षणच्या एकविरा मैदानात महासत्संग भक्तीपर्व होणार असून यामध्ये गुरुदेव हजारो नागरिक,महिला, पुरुष भक्तांना मार्गदर्शन करणार आहेत.तब्बल दहा वर्षानंतर गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे राजराजेश्वर नगरीत पावन आगमन होत असून त्यांचे मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी सुवर्ण संधी शक्तिधाम सेवा समिती व आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून भक्तांना प्राप्त झाली आहे.

सोमवार दि २७ फेब्रुवारी रोजी गुरुदेवांचे दु १२-३० वाजता शिवणी विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर दुपारी गीता नगर येथील शक्तीधाम वास्तूच्या गर्भगृहाचा शिलान्यास सोहळा गुरुदेवांच्या हस्ते होणार आहे.त्या नंतर साय ६ वाजता ते महासत्संग भक्तीपर्व साठी एकविरा मैदानाकडे रवाना होणार आहे.दुसर्‍या दिवशी मंगळवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता गुरुदेव हे खंडेलवाल भवन येथे आर्ट ऑफ लिविंगच्या कार्यक्रमाला संबोधित करून शिवनी विमानतळाकडे रवाना होऊन नाशिकसाठी प्रयाण करणार आहेत.भाविक महिला पुरुषांनी या सोहळ्याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन शक्तिधाम सेवा समिती तथा आर्ट ऑफ लिविंगच्या वतीने करण्यात आले.