राजकीय

राखीव जागांवर निवडणूक लढण्यासाठी,जातपडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध करुन घ्या!

 

 

 

राज्य मुख्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस.मदान यांचे आव्हान.

मुंबई महानगरपालिकेत १सदस्यीय प्रभाग तर उर्वरित महापालिका मध्ये३सदस्यीय प्रभाग रचना

मुंबई२३सप्टेंबर:-महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर,ऐनवेळेची धावपळ टाळण्यासाठी, राखीव जागेवर निवडणूक लढविण्यासाठी भरण्यात येणाऱ्या नामनिर्देशन पत्रात अत्यावश्यक असलेल्या जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करून,जातपडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध करून घेण्याचे आव्हान राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यु. पी.एस.मदान यांनी  केले आहे.आगामी२०२२ मध्ये राज्यातील१५महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.काही दिवसांपूर्वी महानगरपालिका क्षेत्रात प्रभागपध्दती संपुष्टात आल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. परंतु आज झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या कॅबिनेट बैठकीत मुंबई वगळून इतर महानगरपालिकांंमध्ये ३सदस्यीय प्रभाग पध्दतीने निवडणूक घेण्याचे जाहीर केल्याने,अपक्ष आणि आपापल्या वॉर्डात वर्चस्व असणाऱ्यांंचा भ्रमनिरास झाला आहे.राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांनी जाहीर केले आहे की,महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपरिषदा/ नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समिती व ग्रामपंचायती या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काळात मोठ्या प्रमाणावर निवडणुका होणार आहेत. संबधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळ्या कायद्यानुसार राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. त्यासाठी इच्छूक उमेदवारांनी प्रथमत: जात प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. त्यानंतर जातवैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसह जात पडताळणी समितीकडे अर्ज करावा. त्यादृष्टीने आतापासूनच संबंधितांनी तयारी करणे आवश्यक आहे. जेणे करून नामनिर्देशनपत्र सादर करताना ऐनवेळी कोणाचीही धावपळ होणार नाही आणि एकही इच्छूक उमेदवार जातवैधता प्रमाणपत्राअभावी निवडणूक लढविण्यापासून वंचित राहणार नाही.राज्यात पुढच्या वर्षी मुंबईसह पंधरा महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. महापालिका, नगरपंचायत, नगरपालिका यांच्यासाठी प्रभाग पद्धती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चित झाली आहे. मुंबई, कल्याण डोंबिवली, नागपूर, नाशिक, वसई विरार, कोल्हापूर, औरंगाबाद,नवी मुंबई नाशिक, पुणे यासह इतर महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. याशिवाय राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मुदत देखील संपणार आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगकडून करण्यात आलेल्या आवाहनानुसार निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या राजकीय नेत्यांनी जात प्रमाणपत्रासह जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.२३सप्टेंबर रोजी झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेट बठकीत,मुंबई वगळतामुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र २ सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही १ सदस्यीय पद्धत असेल. गेल्या काही काळापासून वॉर्ड तसच प्रभाग पद्धतीवर मोठं राजकारण सुरु आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर यासह काही महापालिकेत दोन सदस्य प्रभाग पद्धत रहावी अशी काही नेत्यांची भूमिका आहे. नगरपंचायतीत एक सदस्य प्रभाग पद्धत, तर नगरपालिकांमध्ये दोन सदस्य प्रभाग पद्धत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता मुंबई महापालिकेत १ सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे. तर इतर सर्व महापालिकेत ३ सदस्यीय प्रभार पद्धत असेल. त्याचबरोबर नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र २ सदस्यीय, तर नगरपंचायतीला १ सदस्यीय प्रभाग असणार आहे.