अकोला: समीर जोशी हे आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त उद्योजक आहेत दुसर्या सत्रांत ते बोलत होते त्यांनी यशस्वी स्टार्टअप साठी ९ मुलं तत्व दिली त्यानी सांगितले की मी मनोहर जोशी यांच्याकडे मोठी जबाबदारी स्वीकारली होती त्यांनी मला एक मूलमंत्र दिला होता तो म्हणजे डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर हे यशस्वी उद्योजक होण्यासाठी गरजेचे आहे .
पुढे बोलताना सांगितले की मला ज्यावेळेस अकोला सारख्या जिल्हयात स्टार्टअप कॉन किल्व्ह करतोय मी अवाक झालो कारण मी गेली १५ वर्षांपासून देश विदेशात काम करीत आहे त्यामुळे अजून विदर्भातील कोणत्याच जिल्यात असा कार्यक्रम झाला नाही त्यामुळे लोकजागर मंच अनिल गावंडे यांनी हा स्टार्टअप कॉन किल्व्ह करून आपल्या अकोला जिल्याला सुद्धा पुढे नेण्याचे काम केले आहे त्यांचे कौतुक जेवढे केले तेवढे कमी आहे.
ट्रान्ससेंडर सर्व्हिसेस प्रा.ली चे एम.डी समीर जोशी,नेओ मोबाईल सी.इ.ओ नमन कोमरे, ज्ञान फाउंडेशन अध्यक्ष अजिक्य कोतावार, डक्स लेझीस चे प्रमुख दिवेन्दू वर्मा, डक्स लेझीस चे सहकारी स्फूर्ती दलोदिया,जेष्ठ पत्रकार प्रमोद चनचूवार,जेष्ठ उद्योजिका सीमा जोशी, उपस्थित मान्यवराचे लोकजागर मंच अध्यक्ष अनिल गावंडे यांनी स्मृती चिन्ह देऊन स्वागत केले यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत अकोट विभागातील उद्योजक आदित्य सर्जिकल कॉटन चे आदित्य आसरकर, पृथ्वी गुडचे शरद नहाटे,संदीप एग्रोव्हस चे संदीप चव्हाळे,झटका ? ग्रोवन चे कृणाल वर्मा,अभांग जिनिग प्रेसिंग संदिप चौधरी, पोल्ट्री फॉर्म चे अक्षय शेंगोकार, फ्लेक्स प्रेन्टिग चे राहुल जायले यांना समूर्तीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संतोष झुंनझुंनवाला,तर प्रमुख अतिथी आशिष राठी,महेंद्र तरडेजा, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे,प्रशांत वर्हाडे, लोकजाजगर मंच जिल्हाध्यक्ष मनीष भांबुरकर मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक अनिल गावंडे सूत्रसंचालन निखिल भड सर,आभार मनीष भांबुरकर यांनी केले यावेळी लोकजागरमंच सम्पूर्ण टीम यांनी यशस्वी स्टार्टअप कॉन किल्व्ह चे नियोजन केले होते यावेळी मोठ्या प्रमाणावर युवक युवती विद्यार्थी, महिला पुरुष उद्योजक सहभागी झाले होते या स्टार्टअप कॉन किल्व्ह चे सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता हे विशेष.