महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार, लोकल ट्रेन हॉटेल्सच्या वेळापत्रकाबाबतीत निर्णय घेण्याची शक्यता!

८ऑगस्ट २०२१

ठळक मुद्दे
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ वाजता राज्यातील जनतेशी संवाद.
मुंबईतील लोकल ट्रेन, हॉटेलच्या वेळापत्रकाबाबत निर्णय घेण्याची शक्यता?
या
मुख्यमंत्री काय घोषणा करणार याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष.
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज(८जुलै) रात्री ८ वाजता राज्यातील नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत. मुंबईतील लोकलट्रेन मधून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवास करण्यासंदर्भातही राज्य सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. याशिवाय राज्यातील हॉटेल व्यवसायिकांनाही हॉटेलच्या वेळा वाढवून हव्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी दुकानदार आणि व्यापारीही बंडखोरीच्या प्रयत्नांत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील हॉटेल संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हॉटेलच्या वेळा वाढवाव्यात अशी मागणी लावून धरली होती. याशिवाय लोकल ट्रेन सुरू करा अशीही मागणी केलेली आहे. विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने देखील लोकलसाठी आंदोलन केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काय बोलणार याची उत्सुकता राज्यातील जनतेला लागलीआहे.राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून,संसर्ग सुद्धा नियंत्रणात येत असून मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये हे नियंत्रण बऱ्यापैकी दिसत आहे. मात्र, काही ठिकाणी काहीशी चिंताजनक स्थितीही आहे. काही भागात डेल्टा प्लस चे रुग्णही आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्या टास्कफोर्सची बैठक घेत आहेत.
आता सर्व गोष्टी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. आपण काय ‘कमरेमे बंद है और चाबी खो जाए’ अशी आपली स्थिती आहे. चावी आपल्या हातात आहे. कोरोनाची परिस्थिती बघून निर्णय घेऊ असे वक्तव्य मुख्यमंत्री ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्याचा आधार घेत मुख्यमंत्री ठाकरे हे मुंबईकरांनसह राज्यातील जनतेला अपेक्षित निर्णय घेतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शेवटी आजच्या लाईव्ह संवाद साधताना मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.