अकोला

मातंग समाजाच्या जवाब दो महामोर्चात सहभागी व्हा – वामनराव भिसे

अकोला :  राज्यातील मातंग समाजाच्या प्रलंबित समस्यांच्या निराकारणासाठी मुंबई येथे 22 फेब्रुवारी रोजी आयोजित जवाब दो महामोर्चात मातंग समाजातील महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन लहुजी शक्ती सेनेचे विदर्भ प्रभारी वामनराव भिसे यांनी केले.

राज्यातील मातंग समाजासह अनुसूचित जातीच्या सर्व 59 जातीला एकत्रित 13 टक्के आरक्षण असून यातील काही जातींनाच या आरक्षणाचा लाभ मिळत आहे.

या आरक्षणात अ ब क ड अशी विभागणी करून एनटी प्रवर्गाप्रमाणे मातंग समाजासह वाल्मिकी, होलार,बुरड गारुडी, खाटीक, डक्कलवार अशा 57 जातीला पण लाभ मिळावा यासाठी हे जवाब दो आंदोलन आयोजित  करण्यात आले आहे.

तसेच पार्टीच्या धरतीवर आर्टी पण  स्थापना करावी.यासाठी शासनाला जाब विचारण्यासाठी जवाब दो आंदोलन दिनांक 22 नोव्हेंबर रोजी आझाद मैदान येथे हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून या जिल्ह्यातील समस्त मातंग बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन वामनराव भिसे, भिकाजी अवचार, प्रकाश दांडगे,विष्णू शेलारकर, पिंटू अंजनकार, गणेश सपकाळ, नारायण मानवतकर, गणेश मानकर, सुभाष इंगळे, अविनाश जाधव ,गोपाल शेलारकर, अजय अवचार, रामेश्वर घनगावकर, दारासिंग ताकतोडे, धीरज दाभाडे, वासुदेवराव जोगदंड, दिलीप वाघमारे, युवराज अंभोरे, रवी अंभोरे, सदाशिव, महादेव क्षीरसागर, अनिल जोंधळेकर, मधुकर वानखडे, प्रभाकर लांडगे आदींनी केले.