क्राईम

माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख ईडी प्रकरणाचा अहवाल लीक केल्याप्रकरणी सीबीआयच्या अधिकाऱ्याला अटक!


मुंबई२सप्टेंबर:-राज्याचे माजी गृहगृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याला मुबंईबार मालकांकडून१००कोटी रुपये वसुली करण्याचे सांगितले, अशा आरोप प्रकरणी ईडीकडून देशमुख यांची चौकशी सुरू आहे.,अशातच सीबीआयचा अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या प्रकरणाचा तपास सुरू केला होता., तपासा अंती हा अहवाल सीबीआयचा उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी अभिषेक तिवारी याला सीबीआयने त्याला अटक करण्यात आली आहे. हा अहवाल लीक केल्याच्या आरोपावरून अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. अभिषेक तिवारी आणि डागा यांचे एकमेकांसोबत फोनवर संभाषण होत होते,तपासा दरम्यान समोर आले आहे. याप्रकरणी अलाहाबाद मध्ये काही आर्थिक देवाण घेवाण झाली काय?याचा सुद्धा तपास सुरू आहे. यासंदर्भातअनिल देशमुख यांच्या वकिलांना अटक केल्याबद्दल, बार कॉन्शील या घटनेच्याबाबत ठोस निर्णय घेऊन, या घटनेचा निषेध केला पाहिजे. अंकुश काकडे, राष्ट्रीय वादी नेते यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलतांना सांगितलं. त्याचप्रमाणे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनीराज्य सरकार सीबीआयला सहकार्य करीत नसल्याचं मत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केलं.