अकोला: स्थानीय दाबकीरोड येथील राजूबाबा आश्रमात संत परमहंस राजूबाबा यांच्या प्रगटोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रकटोत्सवात विविध कार्यक्रम होणार आहेत. दिनांक २१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता राज राजेश्वर दरबार सुंदरकांड मंडळाचे प्रणेते तथा भजनकार श्याम शर्मा यांचा सुंदर कांड वर आधारित कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
तसेच दिनांक २२ मार्च रोजी दुपारी १२ वाजता काल्याचे किर्तन होऊन भव्य महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी सायंकाळी संत राजू बाबा यांची परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या उत्सवात नित्य काकड आरती, दुपारी भागवत व संध्याकाळी हरिपाठ व किर्तन होत आहे. संत राजूबाबा यांच्या भक्तांनी या प्रकटोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री परमहंस राजू बाबा सेवा समिती तथा राजेश्वर दरबार सुंदरकांड मंडळ अकोलाच्या वतीने करण्यात आले आह