अकोला: नारायण रेकीच्या प्रणेत्या मुंबई येथील जीवन प्रेरक राजेश्वरी मोदी अर्थात राज दिदी यांचे आध्यत्मिक मार्गदर्शन महानगरात संपन्न झाले. नारायण रेकी सत्संग परिवार अकोलाच्या वतीने गोरक्षण रोडवरील शुभमंगल सभागृहात शनिवारी संपन्न झालेल्या अध्यात्मिक मार्गदर्शन कार्यक्रमात राजदीदी यांनी जीवन जगण्याचा नवा अंदाज या विषयावर मार्गदर्शन केले.
यात त्यांनी जगण्याची नवी परिभाषा सांगितली.यावेळी अनेकांनी विचारलेल्या प्रश्नांना राजदीदी यांनी समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचा प्रारंभ महिलांच्या स्वागत नृत्याने करण्यात आला. महिलांनी उत्कृष्ट स्वागत नृत्य सादर करून जल्लोष निर्माण केला.
सोहळ्याचा प्रारंभ श्रीकिसन अग्रवाल,चंद्रकला अग्रवाल,पद्मादेवी बाजोरिया, नारायण रेकी सत्संग परिवाराच्या अकोला शाखा अध्यक्ष रिया विनय अग्रवाल, शोभा संतोष अग्रवाल यांच्या दीप प्रजवलनाने करण्यात आला. रिया व शोभा अग्रवाल यांनी राजदीदी यांचे पुष्पगुच्छ व दुपट्टा प्रदान करून स्वागत केले.यावेळी राजदीदी समवेत उपस्थित झालेल्या मुंबई येथील नारायण रेकी सत्संग परिवाराच्या विद्या शास्त्री,संध्या गुप्ता तथा प्रीती तिबडेवाल यांचे स्वागत केले. तसेच परतवाडा येथून आलेल्या परिवाराच्या राखी अग्रवाल, वाशिम मालेगाव येथील सरिता काबरा, पटना येथून आलेले अरविंद कुमार, हिंगणघाट येथील शितल तिबडेवाल, औरंगाबाद येथील माधुरी धानुका आदींचे ही यावेळी अकोला शाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक रिया अग्रवाल यांनी करून अकोला शाखेच्या उपक्रमाची माहिती दिली. संचालन व अतिथी परिचय सारिका गोयनका,सीमा खेतान यांनी केले, तर आभार शोभा अग्रवाल यांनी मानलेत. या सोहळ्याच्या सफलतेसाठी पुनम अग्रवाल, दिशा अग्रवाल,मंजू बजाज, भावना अग्रवाल,शीला अग्रवाल, तरुलता पटेल,अनिता खेतान, कृष्णा लाहोटी, स्वाती राठी, मनीषा बाजोरिया, सीमा अग्रवाल, दिपाली भगत, प्रगती लटूरिया, किरण सिंघानिया, मीरा अग्रवाल, पूजा भूतडा, प्रीती पंडित, राखी गोयनका, रश्मी अग्रवाल, रश्मी रुंगटा, रेखा चांडक,तृप्ती हेडा, शिवानी मोकाशी, नीता सिक्रिया, संगीता सिंघानिया, कांता रांदड समवेत रेडियंट स्टारच्या निधी चौधरी,अपूर्वा अग्रवाल, कोरिओग्राफर सुनील शर्मा,सपना मित्तल समवेत नारायण रेकी सत्संग परिवार अकोला शाखेच्या समस्त पदाधिकारी व सेवाधार्यांनी मेहनत घेतली.