मुंबई

  मंत्रिमंडळ विस्तार झाला असल्याने ,आता विरोधकांचे तोंड बंद होईल –केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले, नवीन मंत्रिमंडळाचे रिपब्लिकन पक्षातर्फे स्वागत

मुंबई दि. 9 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवीन 18 मंत्र्यांनी शपथ घेत मंत्रिमंडळ विस्तार झाला असल्याने आता विरोधी पक्षाचे तोंड बंद होईल अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिली.

नव्या मंत्रिमंडळात आज शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांचे रिपब्लिकन पक्षातर्फे ना.रामदास आठवले यांनी अभिनंदन करीत स्वागत केले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळात सर्व मंत्री अनुभवी असल्याने हे मंत्रिमंडळ मजबूत मंत्रिमंडळ आहे.

महाराष्ट्र राज्याचा चांगला विकास करण्यात हे मंत्री चांगली जबाबदारी पार पाडतील. चांगला राज्य कारभार करतील. राज्यात दलित आदिवासींच्या प्रश्नांकडे चांगले लक्ष देतील असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.