ताज्या बातम्या

भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणी,एकनाथ खडसे विरोधात आरोपपत्र दाखल

पुणे४सप्टेंबर:-भाजपा मधून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आलेले,एकनाथ खडसे, आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात, भोसरी एमआयडीसी मधील भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्याने नाथाभाऊच्या अडचणीत वाढ झाली आहे.या आरोपपत्रात एकनाथ खडसे यांच्या सह मंडकीनी खडसे, गिरीश चौधरी, यांच्यासह तीन कंपन्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आले आहे. या सर्वांवर ईडीने १हजार पानांच्या आरोप पत्रात मणी लॅन्डरिंग आरोप करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात तुरुंगात असलेले, एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज मुबई उच्च न्यायालयाने३सप्टेंबर शुक्रवारी फेटाळून लावल्याने,एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आणखीच वाढ झाल्याचं बोललं जात आहे.भाजप सेना युती सरकार मध्ये मंत्री असतांना एकनाथ खडसे यांनी पदाचा दुरुपयोग करीत,भोसरी एमआयडीसी मधील करोडो रुपयांचा भूखंड, कवडी मोल भावात त्यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या नावे खरेदी केला होता, असा आरोप ईडीने केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. नमूद भूखंड अब्बास मुकानी यांच्या मालकीचा होता, या भूखंडाची किंमत त्यावेळी३१कोटी रुपयांच्या घरात होती, परंतु या भूखंडाची कागदोपत्री कमी किंमत दाखवून, हा भूखंड३.७कोटी रुपयांत खरेदी केल्याने,शासनाची लाखो रुपयांचा स्टॅम्प ड्युटी बुडविल्याचा आरोप सुद्धा, ईडीने लावला आहे. या प्रकरणामुळे राज्यपाल नियुक्त १२आमदारांच्या यादीत नाथा भाऊंचे नांव राहते की नाही असा सवाल उपस्थित झाला आहे?

.