Randhir-sawarkar
राजकीय

भारतीय जनता पक्षातील सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत रणधीर सावरकर यांचे मार्गदर्शन

बोरगाव मंजू : अकोला सहकारातून विकास करण्यासाठी सहकार चळवळ चे नवीनीकरण करण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात नवीन धोरण तयार होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात प्रत्येकाच्या सहकार्याने देशाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प असून या संकल्प मध्ये व नवीनीकरणांमध्ये केंद्र सरकारच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.

भारतीय जनता पक्षातील सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते व विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनात मुंबई सहकार आघाडीचे नेते सुनील बांबुलकर महाराष्ट्र मजदूर फेडरेशनचे अध्यक्ष विलास महाजन सहकार आघाडीचे पश्चिम विदर्भाचे सहसंयोजक विनोद वाघ भाजपा महानगराध्यक्ष विजय अग्रवाल माधव मानकर रमेश आप्पा खोबरे, अकोला जिल्हा सहकार आघाडी अध्यक्ष डॉक्टर अमित कावरे उपस्थितीत बैठकीत ते बोलत होते.

सहकार क्षेत्राची परिस्थिती सहकार क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्ते तसेच सहकार क्षेत्र बळकटी करण्यासाठी उपाय योजना यासंदर्भात सुनील बांबलकर विनोद वाघ व मजदूर फेडरेशनचे विलास महाजन यांचा दौरा होता त्यांनी अनेक विषयावर चर्चा केली व मार्गदर्शन करून सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सर्व क्षेत्राचा विकास करण्याचा संकल्प करून भारतीय जनता पक्षाचा सहकार क्षेत्रामध्ये परिस्थिती याविषयी अवलोकन केले यावेळी आमदार सावरकर यांनी अकोला जिल्ह्यातील सहकार चळवळ संदर्भात माहिती देऊ सरकार चळवळी ही अकोला जिल्ह्यामध्ये घरोघरी पोहोचली असून सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विकासाचा मार्ग प्रस्त होण्यास मदत मिळाली असल्याचे सांगितले.

यावेळी भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी सुद्धा मार्गदर्शन केले तर केंद्र सरकार व राज्य सरकार सहकार क्षेत्रासाठी करीत असलेल्या कामकाजाबद्दल सुनील बांबुलकर त्यांनी माहिती देऊन कामगार क्षेत्रातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी विलास महाजन यांनी अनेक उपाय सांगितले तर विनोद वाघ यांनी पश्चिम विदर्भातील सहकार स्वरूप मजबुती करण्यासाठी अनेक उपाययोजना संदर्भात माहिती संकलन केली कार्यक्रमाचे संचालन माधव मानकर तर आभार प्रदर्शन विठ्ठल चतुरकर यांनी केले तर प्रास्ताविक डॉक्टर अमित कावरे यांनी केले.

यावेळी देवेंद्र देवर शंकरराव वाकोडे अक्षय जोशी संदीप इंगळे महेंद्र पेजावार अमोल साबळे चंद्रकांत अंधारे प्रदीप खाडे कपिल खराब विठ्ठल चतरकर अतुल विखे राजेश निराळे राजू काकड योगेश कोंढरकर राजेंद्र मावळकर गजानन नळकांडे वसंतराव चव्हाण अशोक राठोड प्रकाश श्रीमाळी अशोक गावंडे प्रेमानंद लहाने अशोक कोहर गोवर्धन सोनटक्के कपिल ठाकरे योगेश कोंदरकर आधी उपस्थित होते.