अकोला

भाजपा पुर्व महिला मोर्चा च्या वतीने ज्येष्ठ समाज सेविका आणि कर्तुत्ववान महिलांचा सत्कार सोहळा

बोरगाव मंजू : समाजाप्रती कर्तव्याची भावना ठेवून समाजातील चांगल्या काम करणार्‍या व समाजाला प्रेरक असे कार्य आपल्या कर्तुत्वाने आपल्या संस्काराने संस्कृतीने आपला परिसर आपलं नगर आपला जिल्हा व राज्याचं नाव रोशन करणार्‍या प्रसिद्धीपासून दूर राहणार्‍या अशांना सन्मान करण्याची परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सुरू केली हीच परंपरा संघटनात्मक भाजपा महिला आघाडीने सर्वांना सोबत घेऊन स्वर्गीय सुषमा स्वराज अवार्ड च्या माध्यमातून गौरव करण्याची परंपरा सुरू केली आहे.

विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान करणे हा कार्यक्रम दिशादर्शक असल्याची असल्याची प्रतिपादन कमल सखी मंचाच्या नेत्या सौभाग्यवती सुहासिनी ताई धोत्रे यांनी केले.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केंद्र शासन मान्य स्व.सुषमा स्वराज अवॉर्ड भाजपा पुर्व महिला मोर्चा चया वतीने ज्येष्ठ समाज सेविका आणि कर्तुत्ववान महिलांचा सत्कार सोहळा त्या बोलत होत्या.

भाजपा पूर्व महिला मोर्चा च्या वतीने आयोजित स्व.सुषमा स्वराज अवॉर्ड सोहळ्यात जेष्ठ समाज सेविका आणि विविध श्रेत्रात कर्तृत्व गाजवणार्‍या महिलांचा सत्कार सोहळा पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सौ. सुहासिनीताई धोत्रे , प्रमुख उपस्थिती सौमंजुषाचे सावरकर सौ. अर्चनाताई शर्मा अर्चनाताई मसने (मा.महापौर) चंदाताई शर्मा सीमाताई मांगटेपाटील, सुनिता भाभी अग्रवाल. जेष्ठ समाज सेविका सौ.स्मिता ताई कायंदे, सौउषा ताई बापोरिकर ,सौ.रेखा मुळवतकार , तारा ताई हातवळणे, अश्विनी ताई हातवळले तसेच सौ.शुभांगी कुलकर्णी , अकोल्यातील ज्येष्ठ समाजसेविका, राष्ट्रीय सेवा समिती च्या कार्यकर्त्या यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाच्या वतीने विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणार्‍या तसेच विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी चा सत्कार करण्यात आला. .

बुद्धिबळ सारख्या खेळात गगन भरारी घेणार्‍या आरुषी मुकेश भाटिया हिला स्व. सुषमा स्वराज अवार्ड दिला.कोरोणा काळात काम करणार्‍या डॉक्टर नेहा सुमित अग्रवाल यांना दिला . बाल विकास विशेष शाळा या शाळेसाठी विशेष काम करणार्‍या सारिका ताई कांडलकर यांना दिला. अखिल भारतीय अकोला जिल्हा मारवाडी महिला संमेनलन च फाउंडरअध्यक्ष या मंडळात सोबत सामाजिक कार्यात महत्वपूर्ण योगदान असलेल्या ममता संजय सारडा यांना देण्यात आला. स्वयंसिद्ध संस्थेच्या सोबत काम करणार्‍या आणि मुलींना स्व संरक्षणाचे प्रशिक्षण देणार्‍या तसेच विविध अवार्ड त्यांच्या नावावर असलेल्या कु. खुशबू चोपडे हिला देण्यात आला दैनिक भास्करच्या पत्रकार नीलम तिवारी यांना देण्यात आला .

तसेच होमी भाभा सारख्या परीक्षेत बाल वैज्ञानिक म्हणून निवड झालेल्या कू. ग्रीष्मा अजय ताठोड हिला गौरविण्यात आले ..IMO, NSO,C .V Raman सारख्या विविध स्पर्धे परीक्षेत गोल्ड मेडल मिळवलेल्या राजश्री शेगोकार हिला गौरविण्यात आले तसेच गार्गी भगत याचा पण गौरव करण्यात आला कु. खुशबू चोपडे हिने उपस्थित महिलांना स्व. संरक्षणाविषयी मार्गदर्शन केले. तसेच सौ सुहासिनी ताई धोत्रे यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौनिकीता देशमुख सूत्रसंचालन रश्मी कायंदे आभार प्रदर्शन माधुरीताई भगत यांनी केले. ङआयोजक..सौ. निखिता राहुल देशमुख भाजपा पूर्व महिला मोर्चा मंडळअध्यक्षङसातत्याने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून समाज व राष्ट्रहित सोबत समाजातील विविध घटकांना एकत्रित करून त्यांच्या कर्तुत्वाचा सन्मान करण्याचा कार्यक्रम करून अकोला पूर्व या क्षेत्रामध्ये कर्तव्यासोबत मानवतेचे कार्य करीत आहे. अकोला पूर्व क्षेत्रातील मातृ शक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.