अकोला

बारलिंगा येथे दत्तनाम सप्ताहास प्रारंभ

बाळापूर : बाळापूर तालुक्यातील बारलिंगा येथे १७ मार्च रोजी शुक्रवारपासून अखंड दत्तनाम सप्ताह तसेच ग्रंथ प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. बारलिंगा येथे महापूजेकरिता गुरुमूर्ती वासुदेव भारती महाराज माहूरगड, गुरुमूर्ती केवळभारती महाराज, गुरुमूर्ती मोहनराज भारती महाराज, गुरुमूर्ती प्रेमगीर महाराज कळंबा, गुरुमूर्ती डिगांबरपुरी महाराज माटरगाव, गुरुमूर्ती आनंदपुरी महाराज तरोडा, गुरुमूर्ती रामपुरी महाराज माहूर, गुरुमूर्ती अक्षयानंद महाराज अंबासी, गुरुमूर्ती हनुमान महाराज नेर आदीची उपस्थिती लाभणार आहे.

Sinha-Hospital-Advt Akola
संपर्क 9356215876, 9011024745

धर्म सिद्धांत ग्रंथाचे वाचन श्री धोंडूपंत करणार असून, ग्रंथाचे निरूपण श्री हरिराम पाटील डिक्कर यांच्या सुमधुर वाणीमधून केले जाणार आहे. सप्ताहामध्ये काकडा, गं्रथवाचन, प्रवचन, सोडस पूजा आदी दैनंदिन कार्यक्रम राहणार असून, २३ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या ज्ञानयज्ञाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आनंद संप्रदाय मंडळ तथा समस्त गावकरी मंडळी बारलिंगा यांच्या वतीने करण्यात आले आहे.