क्राईम

बंदूकीच्या आणि चाकूचा धाकावर बार लुटल्याच्या व्हिडिओ शोशल मीडियावर व्हायरल

जालना, न्यूज डेस्क, 12 ऑगस्ट जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या,एका बारमध्ये अज्ञात दोन व्यक्तींनी बंदुकीचा आणि चाकूचा धाक दाखवीत बार मध्ये लूट केल्याचा व्हिडिओ शोषल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या,बदनापूर शहरातील असल्याचे समोर आले आहे.बार मध्ये घालण्यात आलेला हैदोस आणि लुटीचा प्रकार बार मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्या मध्ये कैद झाला आहे.पोलीस तपासादरम्यान ही घटना ११ऑगस्ट रोजी घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार११ऑगस्ट रोजी दोन अज्ञात तोंडाला मास्क बांधून बदनापुरातील विराज बारमध्ये घुसले आणि आपल्या कडील बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून लूट केली.विराज बार चे मालक शिवाजी अंभोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बारमध्ये बसलेल्या एका ग्राहकाची रोख रक्कम,४ग्राहकांच्या मोबाईल आणि बार मधील दारूच्या बाटल्या लुटून नेल्याचे नमूद करण्यात आले आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या दरोड्याच्या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, जालना पोलीस दरोडेखोरांचा तपास करीत आहेत.