अकोला२०: महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना चे संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोटकर यांच्या वाढदिवसा निमित्त शहर वाहुतुक नियंत्रण शाखा अकोला येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. पोलीस नेहमी टेंशन मध्ये असतात, त्यांना झोप वेळेवर मिळत नाही, जेवण वेळेवर होत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना अकोला च्या वतीने जिल्हाध्यक्ष आशिष सावळे व जिल्हा उपाध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांनी पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या सोबत चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शना खाली शुगर तपासणी, इ. सी.जी, बी. पी. तपासणी करण्यात आले. कर्मचारी राहुल देशमुख, सुरेंद्र खंडारे, श्याम पेंदरे, उमेश इंगळे, ज्ञानेश्वर चिकटे, पूजा दांडगे, नीता सनके ठाकरे, शेख नईम, गजानन निकनवरे, विजय धबाले, रवी चव्हाण, नामदेव भोरकडे, सतीश हाडोळे, राधेश्याम पटेल, अनिल लापूरकर, विकास गोलाकार, अनिल अंबिलकर, शुभम भातलीक, तसेच महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना जिल्हाध्यक्ष आशिष सावळे, उपाध्यक्ष उमेश इंगळे, विजय गावंडे, सोनू वानखडे, जिल्हा सचिव सतीश तेलगोटे, पुष्कर हिवराळे, अर्जुन बागडे, समीर खान,आदी पदाधिकारी उपस्थित होते.